सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ

भिलार, जि. सातारा - येथे लागवड करण्यात आलेले स्ट्रॉबेरी.
भिलार, जि. सातारा - येथे लागवड करण्यात आलेले स्ट्रॉबेरी.

सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड महाबळेश्वर तालुक्‍यात होते. त्यानंतर जावळी, वाई, कोरेगाव, सातारा व पाटण या तालुक्‍यांत लागवड केली जाते. प्रत्येक वर्षी साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सप्ताहापासून स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ होतो. याही हंगामात १५ सप्टेंबरपासून स्ट्रॅाबेरी लागवड सुरू झाली आहे. स्ट्रॅाबेरी रोपे निर्मितीसाठी आवश्यक मातृवृक्ष वेळेत आले होती. मात्र महाबळेश्र्वर यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रोपे निर्मितीसाठी अडचणी आल्या होत्या. लागवडपूर्व मशागतीच्या कामावेळी पावसाने उघडीप दिल्याने ही कामे आता सुरू आहे. रोपाची निर्मिती अजूनही सुरू असल्याने लागवड काहीकाळ लांबणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

जिल्ह्यात परदेशातून विविध जातींची १२ लाख मातृरोपे आली होती. यापासून सुमारे सहा कोटी रोपनिर्मितीचा अंदाज आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस झाली असल्याने यामध्ये रोपांची निर्मिती केली जात आहे. महाबळेश्र्वर तालुक्यात २२०० ते २५०० व इतर सर्व तालुक्यांत १२०० ते १५०० एकर असे एकूण चार ते साडे चार हजार क्षेत्रावर लागवडीचा अंदाज आहे. सध्या स्ट्रॅाबेरी लागवडीस प्रारंभ झाला असून साधारणपणे अॅाक्टोबरअखेर ही लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. यानंतर महाबळेश्र्वरसह इतर तालुक्यांतील अंतिम लागवड स्थिती समजणार आहे.

स्ट्रॉबेरी लागवडीच्या कामास सुरवात झाली आहे. रोप निर्मितीस उशीर होत असल्याने लागवड हंगाम लांबणार आहे. पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या स्ट्रॅाबेरी दिवाळीदरम्यान उपलब्ध होणार आहे.
- गणपत पार्टे, अध्यक्ष श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, भिलार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com