ब्रिटिश एअरवेजला २२ कोटी डॉलरचा दंड

British-Airways
British-Airways

लंडन - प्रवाशांच्या डेटाचोरीप्रकरणी ‘ब्रिटिश एअरवेज’ला तब्बल २२.९७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयाकडून याबाबतची नोटीस लवकरच जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुपने (आयएजी) सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीचे संकेतस्थळ हॅक झाले होते. या सायबर हल्ल्यात हॅकर्सनी जवळपास ५ लाख प्रवाशांच्या बॅंक (क्रेडिट कार्ड) खात्यांची माहिती चोरली होती. सुरक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याचा ठपका ब्रिटिश एअरवेजवर ठेवण्यात आला असून, त्यासाठी ब्रिटनमधील नियामकाने कंपनीला सुमारे २२.९७ कोटी डॉलर इतका दंड ठोठावला. ही रक्कम कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या १.५ टक्के असल्याचे ‘आयएजी’ने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com