शेअर बाजार पुन्हा गडगडला

शेअर बाजार पुन्हा गडगडला

मुंबई: शेअर बाजारात आज (सोमवार) पुन्हा मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 546 अंशांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स सध्या 36 हजार 304.90 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 175 अंशांची घसरण होऊन तो 10 हजार 966.35 अंशांवर व्यवहार करतो आहे. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा सुरु आहे. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 2 टक्क्याने घसरला तर निफ्टीच्या मिडकॅप 100 निर्देशांकमध्ये 2.5 टक्क्यांची घसरण झाली. तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात 2 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल, फार्मा, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, रिअल्टी आणि पॉवर कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक विक्रीचा मारा सुरु आहे. तर बँक निफ्टी 2 टक्के घसरणीसह 25 हजार 071 पातळीवर व्यवहार करतो आहे. 

इंडियाबुल्स हाउसिंग, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रत्येकी 12.5-3.7 टक्क्यांची घसरण झाली. टीसीएस, टेक महिंद्रा, कोल इंडिया, इन्फोसिस, ओएनजीसी आणि एनटीपीसीचे शेअर 3.4-1.5 टक्क्यांनी धरले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com