स्विस बॅंकेत भारतीयांचे सात हजार कोटी

Swiss-Bank
Swiss-Bank

वर्षभरात खात्यात ५० टक्‍क्‍यांनी वाढ; बॅंकांनाही चांगला नफा
झुरिच - मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा २०१७ या वर्षात ५०.२ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. २०१७ मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण ७ हजार कोटी रुपये जमा केले आहेत.

सलग तीन वर्षांच्या घसरणीनंतर रकमेत वाढ झाली आहे. त्याचवेळी २०१७ मध्ये पाकिस्तानी खातेदारांकडून जमा होणाऱ्या रक्कमेत २१ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. असे असले तरी या वर्षी ७७०० कोटी रुपये जमा झाले असून, ते भारतीय खातेदारांपेक्षा अधिक आहेत. 

२०१६ च्या तुलनेत या वर्षी स्विस बॅंकेत जमा झालेल्या एकूण रकमेत ३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ही रक्कम तब्बल १०० लाख कोटी आहे. २०१७ मध्ये भारतीयांच्या खात्यातील पैसा एक अब्ज स्विस फ्रॅंक म्हणजेच तब्बल ७ हजार कोटींपर्यंत पोचला आहे. एकीकडे नरेंद्र मोदी सरकार काळ्या पैशांविरुद्ध मोहीम राबवत असताना स्विस बॅंकेतील भारतीयांच्या खात्यातील वाढलेली रक्कम खळबळ उडवणारी आहे. 

स्विस नॅशनल बॅंकेच्या वार्षिक आकडेवारीनुसार स्विस बॅंकेच्या खात्यात भारतीयांच्या पैशांत २०१६ मध्ये ४५ टक्‍क्‍यांनी घसरण होऊन ६७.६ कोटी फ्रॅंक (सुमारे ४५०० कोटी रुपये) झाली होती. एसएनबीच्या आकडेवारीनुसार भारतीयांकडून थेट खात्यात जमा झालेली रक्कम २०१७ मध्ये ६८९१ कोटी रुपये (९९.९ कोटी फ्रॅंक) इतकी आहे, तर फंड मॅनेजरच्या माध्यमातून या खात्यात जमा झालेली रक्कम ११२ कोटी रुपये (१.६२ कोटी फ्रॅंक) आहे. 
यादरम्यान, स्वित्झर्लंड बॅंकेचा नफा २०१७ मध्ये २५ टक्‍क्‍यांनी वाढून ९.८ अब्ज फ्रॅंक इतका झाला आहे. मात्र, या बॅंकेत परकीय खातेदारांच्या रकमेत घट झाली आहे.

स्विस बॅंकेत भारतीयांचा वाढलेला पैसा (टक्केवारीत)
१२ - २०११
४३ - २०१३
५०.२ - २०१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com