अॅडगुरु अॅलेक पद्मसी यांचे निधन

Alyque Padamsee
Alyque Padamsee

मुंबई : अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी (वय 90) यांचे आज (शनिवार) मुंबईत निधन झाले.

'गांधी' या 1982 मध्ये आलेल्या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती. अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. अॅडगुरु असलेल्या पद्मसी यांची भारतातील अव्वल दर्जाची जाहिरात एजन्सी होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांसाठी जाहिराती बनविल्या.

'ब्रँड फादर ऑफ इंडियन अॅडव्हर्टायजिंग' असे त्यांना ओळखले जायचे. 'सर्फ', 'लिरील गर्ल', 'चेरिंग ब्लॉसम शु पॉलिश', 'हमारा बजाज', 'एमआरएफ मसल मॅन' अशा अनेक प्रसिद्ध जाहिरातींची निर्मिती त्यांनी केली. 

जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच मुंबईतील अॅडव्हर्टायजिंग क्लबतर्फे 'अॅडव्हर्टायजिंग मॅन ऑफ द सेंच्युरी' असे गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीतर्फे 2012 मध्ये टागोर रत्न पुरस्कार दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com