काँग्रेस नेते अजय माकन यांचा राजीनामा

Ajay Maken Resigned From Delhi Congress President
Ajay Maken Resigned From Delhi Congress President

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर माकन उपचारांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. अजय माकन यांनी 13 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. परंतु, काँग्रेसकडून अद्याप राजीनामा स्वीकारला नसल्याचे वृत्त आहे. 

माकन यांनी गेल्या महिन्यातच पक्षनेतृत्वाला राजीनाम्याविषयी कल्पना दिली होती. माकन यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील युवा नेत्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्याचा विचार पक्षाकडून सुरू आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता, त्यावेळीही माकन यांनी पदाचा राजीनामा दिला होता, मात्र तेव्हाही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.

54 वर्षीय माकन यांनी 2015 मध्ये दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने माकन यांच्याकडे दिल्लीची धूरा सोपवली होती. लोकसभा निवडणूकजवळ असतानाच माकन यांनी राजीनामा दिल्यास दिल्ली काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com