अमित शहांना स्वाइन फ्लू; 'एम्स'मध्ये उपचार सुरू 

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज दाखल करण्यात आले. 

"मला स्वाइन प्लूची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून, उपचार सुरू आहेत. ईश्वराचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर मी लवकरच बरा होईन,' असे शहा यांनी आपल्या "ट्विट'मध्ये नमूद केले आहे. 

"एम्स'मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर शहा यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. "एम्स'चे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक शहा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रात्री "एम्स'मध्ये जाऊन शहा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com