मोदी म्हणजे चोरांचे सरदार- राहुल गांधी

rahul gandhi
rahul gandhi

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी चांगलेच लक्ष केले आहे. मोदींनी म्हटले होती की, मी या देशाचा पंतप्रधान नाही, तर चौकीदार आहे. राहुल यांनी या वाक्याचा संदर्भ देत 'हिंदुस्थान का चौकीदार ही भागीदार है', अशा शब्दात मोदींवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारने राफेलसंबधी कशा प्रकारे फक्त रिलायंस कंपनीचा पर्यायच समोर ठेवण्यात आला याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी राफेल गैरव्यवहारासंबधी जबाबदार ठरवले आहे.
 

दरम्यान, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (ता.22) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही केली होती. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले होते. राफेल करारावर मोदी अजूनही गप्प आहेत हे थक्क करणारे आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी परदेशी अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना चोर म्हटले आहे, हे खूपच निंदनीय असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला होता. त्या आरोपांना समोर ठेऊनच राहुल गांधी यांनी आजचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com