पुणे विद्यापीठ, मुंबई आयआयएमचा झेंडा

NIRD
NIRD

नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला; तर अन्य संस्थांच्या यादीत आयआयएम मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलजी, मुंबई यांना स्थान मिळाले आहे.

जगातील पहिल्या २०० दर्जेदार विद्यापीठांत भारतीय विद्यापीठ औषधालाही नाही, या पार्श्‍वभूमीवर प्रकाश जावडेकर यांच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना गुणवत्ता मानांकन देण्याचा प्रोत्साहनात्मक उपक्रम २०१५ मध्ये मंजूर केला व पुढच्या वर्षी पहिली यादी आली. शैक्षणिक वातावरण, नवनवीन शोधांचा पुढाकार, विकासासाठी पूरकता आदी निकषांवर मानांकन यादी निश्‍चित केली जाते.

यंदा देशभरातील ४००० हून जास्त शिक्षणसंस्थांनी विविध गटांमध्ये अर्ज पाठविले होते. सर्वसाधारण गटासह विद्यापीठे, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वास्तुशास्त्र, विधी-न्याय व वैद्यकीय या गटांतील शैक्षणिक संस्थांची नामावली आज जाहीर करण्यात आली.

सर्वसाधारण गट 
आयआयटी मद्रास, चेन्नई : १ 
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर : २ 
आयआयटी, दिल्ली : ३ 
आयआयटी, मुंबई : ४ 
आयआयटी, खडगपूर : ५ 
आयआयटी, कानपूर : ६ 
जेएनयू, नवी दिल्ली : ७ 
आयआयटी, रुड़की : ८ 
आयआयटी, गुवाहाटी : ९ 
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी : १० 

अभियांत्रिकी
आयआयटी, मद्रास : १ 
आयआयटी, दिल्ली : २ 
आयआयटी, मुंबई : ३ 
आयआयटी, खड़गपूर : ४ 
आयआयटी, कानपूर : ५ 
आयआयटी, रुड़की : ६ 
आयआयटी, गुवाहाटी : ७ 
आयआयटी, हैदराबाद : ८ 
अण्णा विद्यापीठ, चेन्नई : ९ 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी, तिरुचिरापल्ली : १० 

औषधनिर्माणसास्त्र  
जामिया हमदर्द, नवी दिल्ली : १  
पंजाब युनिवर्सिटी, चंडीगड : २ 
नैशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एजुकेशन अँड रिसर्च, मोहाली : ३ 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलजी, मुंबई : ४ 
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी अँड सायन्स, पिलानी : ५ 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एजुकेशन अँड रिसर्च, हैदराबाद : ६ 
कॉलेज ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस, उडूपी : ७ 
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, नीलगिरी : ८ 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, गांधीनगर : ९ 
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर : १०

व्यवस्थापनशास्त्र 
आयआयएम, बंगळूर : १ 
आयआयएम, अहमदाबाद : २ 
आयआयएम, कोलकता : ३ 
आयआयएम, लखनौ : ४ 
आयआयएम, इंदूर : ५ 
आयआयएम, खड़गपूर : ६ 
जेवियर लेबर रिलेशन्स इन्स्टिट्यूट, जमशेदपूर : ७ 
आयआयएम, कोझिकोड : ८ 
आयआयटी, दिल्ली : ९ 
आयआयटी, मुंबई : १० 

वैद्यकीय
एम्स, नवी दिल्ली : १ 
पोस्ट ग्रैजुएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंडीगड : २ 
ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर : ३ 

विद्यालये
मिरांडा हाउस, दिल्ली : १ 
हिंदू कॉलेज, दिल्ली : २ 
प्रेजिडेंसी कॉलेज, चेन्नई : ३ 
सेंट स्टीफेन्स कॉलेज, दिल्ली : ४ 
लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन, नवी दिल्ली : ५ 
लॉयला कॉलेज, चेन्नई : ६ 
श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, दिल्ली : ७ 
राम कृष्ण मिशन विवेकानंद सेंटेनरी कॉलेज, रहारा : ८ 
हंसराज कॉलेज, दिल्ली : ९ 
सेंट जेवियर कॉलेज, कोलकता : १० 

वास्तुशास्त्र 
आयआयटी, खडगपूर : १ 
आयआयटी, रुड़की : २ 
नैशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी कालीकत : ३ 

विधी व न्याय 
नैशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिवर्सिटी, बंगळुरू : १ 
राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नवी दिल्ली : २ 
नलसार विधी विद्यापीठ, हैदराबाद : ३ 

सरकारी अनुदानित संस्था
आयआयटी, मद्रास : १ 
आयआयटी, मुंबई : २ 
आयआयटी, दिल्ली : ३ 
आयआयटी, बंगळूर : ४ 
आयआयटी, खड़गपूर : ५ 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलजी, मुंबई : ६ 
आयआयटी, कानपूर : ७ 
आईआईटी, रुड़की : ८ 
पंजाब यूनिवर्सिटी, चंडीगड : ९ 
आयआयटी, हैदराबाद : १० 

खासगी संस्था 
वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी, तमिळनाडू : १ 
कालिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्‍नॉलजी खोरधा, भुवनेश्‍वर : २ 
एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलजी, चेन्नई: ३ 
जेएसएस ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, म्हैसूर: ४ 
वेल टेक रंगराजन डॉ. शगुनथला आर अँड डी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलजी, चेन्नई : ५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com