Engineers Day : डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना डुडल समर्पित

Engineers Day Sir M Vishweshwaraiah Google Doodle
Engineers Day Sir M Vishweshwaraiah Google Doodle

नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल तयार करून भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असते. त्यांमुळेच आज इंजिनिअर्स डे या खास दिवसाचं औचित्य साधत भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त एक खास डूडल तयार केले आहे. त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाला या डुडलच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे. 

डॉ. विश्वेश्वरय्या यांचं पूर्ण नाव डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या असं आहे. 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'इंजिनिअर्स डे' म्हणून साजरा होतो. दक्षिण भारतातील मैसूर, कर्नाटकला विकसित आणि समृद्धशाली क्षेत्र बनवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये विश्वेश्वरय्या यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. तसेच एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरं स्पष्टपणे दिसत आहेत. आपल्या कामालाच परमेश्वर मानणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये त्यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. 

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते 15 वर्षाचे असतांना निधन झाले. त्याने त्यांचे कुटुंब हादरले होते. त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगळुरु येथे झाले. 1881 साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे घेतले. 1883 मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

डॉ. विश्वेश्वरय्या म्हैसूर येथे असताना त्यांना, जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन 1955 मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगळुरु शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही पदवी देउन गौरविले आहे. ते सन 1923 च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्षदेखिल होते.

भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचं जीवन अतिशय समृद्ध असं होतं. विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळय़ात झाली. 1884 ते 1908 पर्यंत ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक अभियंता होते. तेव्हा तब्बल 16 महिने विश्वेश्वरय्या धुळय़ात होते. अभियांत्रीकी क्षेत्राशी संबंधित शिक्षण पद्धतीमध्येही त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com