''गली गली में शोर है, चौकीदार चोर है''

Gali gali me shor hai Hindustan ka chowkidar chor hai Rahul Gandhi in Rajasthan
Gali gali me shor hai Hindustan ka chowkidar chor hai Rahul Gandhi in Rajasthan

नवी दिल्ली : ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. बोफोर्स गैरव्यवहार समोर आल्यानंतर तत्कालीन विरोधीपक्षांनी राजीव गांधी यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर याच घोषणांचा वापर पंतप्रधान मोदींवर टीका करताना करण्यात आला.

राजस्थानातील डुंगरपूर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ''महिलांशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही. म्हणून मला निवडणुकीत अनेक महिला उमेदवारांचा समावेश झाल्याचे पाहायचे आहे. जर आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही अशी इच्छा बाळगतो, की एक दिवस असा येईल, तुमच्या फोनच्या मागे 'मेड इन राजस्थान', 'मेड इन डुंगरपूर', असे लिहिलेले असेल''. 

बोफोर्स गैरव्यवहार समोर आल्यानंतर 'गली गली में शोर है, राजीव गांधी चोर है' अशा घोषणा 1980 मध्ये विरोधकांकडून देण्यात आल्या होत्या. या घोषणेवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है''.

दरम्यान, मध्यप्रदेशातील रोड शोनंतर राहुल गांधी सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संगवारातील गायत्री मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com