कमांडर अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका

Injured commander Abhilash Tomy to be rescued
Injured commander Abhilash Tomy to be rescued

नवी दिल्ली : हिंदी महासागरात स्पर्धेदरम्यान जखमी होऊन तीन दिवस अडकून पडलेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची आज सुटका करण्यात आली. अभिलाष यांनी गोल्डन ग्लोब स्पर्धेत सहभाग घेतला होता.

छोट्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करत असताना ऑस्ट्रेलियापासून 1900 सागरी मैल अंतरावर त्यांना वादळाचा तडाखा बसला. वादळामुळे समुद्रात 14 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या वादळात त्यांच्या बोटीचे नुकसान होऊन त्यांच्या पाठीला जखम झाली. अभिलाष यांनी स्पर्धेच्या आयोजकांना संदेश पाठवत परिस्थिती सांगितली. आपल्या पाठीला जबर मार बसला असून हालताही येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या नौदलांनी आपली बचावपथके रवाना केली. तीन दिवसांनंतर आज फ्रान्सचे पथक सर्वप्रथम अभिलाष यांच्या बोटीजवळ पोहोचले आणि त्यांना सुखरुप बाहेर काढले.

बिकट हवामानात आणि जखमी असतानाही अभिलाष यांनी तीन दिवस बोटीवर तग धरला. अभिलाष हे कीर्तिचक्र विजेते आहेत. त्यांनी 2013 मध्ये पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली होती. गोल्डन ग्लोब या तीस हजार मैल प्रवास करण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांना सॅटेलाइट फोन व्यतिरिक्त कोणत्याही आधुनिक साधनांचा वापर न करता एकट्याने स्पर्धा पूर्ण करायची असते. 

अशी झाली सुटका 
- शुक्रवारी (ता. 21) वादळाचा तडाखा 
- कमांडर अभिलाष यांच्याकडून आयोजकांशी संपर्क 
- आयोजकांकडून माहिती मिळाल्यानंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि भारताची पथके रवाना 
- रविवारी (ता. 23) अभिलाष यांची नौका हेलिकॉप्टरमधून सापडली 
- सोमवारी (ता. 24) फ्रेंच पथकाकडून अभिलाष यांची सुटका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com