भारतीय लष्कराचे 50 जवान 'हनीट्रॅप'मध्ये?

honeytrap
honeytrap

नवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे. हिरवी साडी परिधान केलेली आणि गालावर खट्याळ हास्य मिरवणाऱ्या अनिकाने लष्करातील पन्नासपेक्षाही अधिक जवानांना "हनीट्रॅप'मध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था "आयएसआय'नेच हे फेक अकाउंट तयार करून भारतीय जवानांकडून संवदेनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी अनिकाच्या गळाला लागलेला जैसलमेर येथील जवान शिपाई सोमवीरसिंह याला अटक केली असून, त्याला सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. लष्कर आणि शस्त्रांची छायाचित्रे, महत्त्वाची स्थळे आणि लष्करी कवायतींबाबतची माहिती संबंधित तरुणीशी शेअर करताना सोमवीरला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, सोमवीरने मात्र आपल्याला संबंधित महिलेचा ठावठिकाणा माहिती नसल्याचे म्हटले आहे.

ऑनलाइन मैत्री
सोमवीर आणि अनिका यांची 2016 मध्ये फेसबुकवरून मैत्री झाली होती, पुढे हे ऑनलाइन नाते आणखीनच घट्ट होत गेले, एवढेच काय पण सोमवीरने यासाठी स्वत:च्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याचीही तयारी चालविली होती. सोमवीरला जम्मू येथून नियमितपणे फोन येऊ लागल्याने लष्कराचे अधिकारी सावध झाले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी अनिका चोप्रा हिचे फेसबुक अकाउंट आणि चॅटिंग तपासले असता ते पाकिस्तानातून ऑपरेट होत असल्याचे उघड झाले.

पैसे घेतले
सोमवीरने अनिकाला लष्करासंबंधीची बरीचशी संवेदनशील माहिती पुरविल्याचे उघड झाले आहे, या महितीच्या बदल्यात त्याने अनिकाकडून पाच हजार रुपये स्वीकारले होते, असेही निष्पन्न झाले आहे. सोमवीरप्रमाणेच पन्नास सैनिक अनिकाच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय व्यक्त होतो आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. तत्पूर्वी भारतीय हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मध्यंतरी फेसबुकवर मैत्रीण झालेल्या एका महिलेला संवेदनशील माहिती पुरविल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. दिल्लीतील एका ग्रुप कॅप्टनला देखील संबंधित महिलेने तिच्या जाळ्यात ओढल्याचा संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com