'ते' व्हायरल करणाऱ्यांना अटक

juby_anoop
juby_anoop

तिरुअनंतपुरम : सोशल मिडियावर एखाद्या फोटोवर कमेंट करणे, एखद्याची खिल्ली उडवणे ही नेहमीचीच गोष्ट आहे. परंतु, हिच गोष्ट काही जणांना महागात पडली आहे. सोशल मीडियावर एका केरळी दाम्पत्याविषयी खोटी माहिती वायरल करणाऱ्या आणि नववधूच्या शरीरयष्टीची चेष्टा करणाऱ्या ट्रोलर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यासाठी पाच जणांना अटक केली आहे. 

29 वर्षीय अनूप पी सबॅस्टियन आणि 27 वर्षांची ज्यूबी जोसेफ चार फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. केरळातील कुन्नूरमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. नवदाम्पत्याचा फोटो स्थानिक वृत्तपत्रातील विवाहसंबंधी विभागात छापण्यात आला होता. त्यानंतर या सगळ्याला सुरुवात झाली. काही टवाळखोरांनी अनूप-ज्यूबी यांचा हा फोटो खोट्या माहितीसह सोशल मीडियावर वायरल केला. अचानक एके दिवशी अनूप-ज्यूबी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवराळ भाषेतील मेसेज आणि फोन यायला लागले. इतकंच काय, तर ज्यूबीच्या शरीरयष्टीची खिल्ली (बॉडी शेमिंग) उडवणारे मेसेजही लिहिले जात होते.

सुरुवातीला दोघांनाही हा प्रकार काय आहे, हे समजत नव्हते. परंतु, वस्तुस्थिती समोर आल्यावर दोघांनाही धक्का बसला. त्यानतंर या दोघांनी पोलिसांत तक्रार केली.

व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये 'फोटोत दिसणारी महिला (ज्यूबी) 48 वर्षांची, तर तरुण (अनूप) 25 वर्षांचा आहे. तसेच महिलेची संपत्ती 25 कोटींची असून, 101 भेटवस्तूंसह 50 लाखांच्या हुंड्यासाठी हे ल्गन करण्यात आले. हे लग्न केरळातील चेरुपुझामध्ये येथे झाले. असा खोटा मेसेज अनूप-ज्यूबीच्या फोटोसह वायरल करण्यात आला होता.

या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, विशेष हे की या पाच जणांपैकी एकही व्यक्ती अनूप-ज्यूबीच्या परिचयातील नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com