फेसबुकवरील 'फेक न्यूज' पोस्टप्रकरणी एकाला अटक

Man Arrested For Fake News Facebook Post On Tripura CM Biplab Kumar Deb
Man Arrested For Fake News Facebook Post On Tripura CM Biplab Kumar Deb

अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारी "फेक न्यूज' फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती त्रिपुराच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवार) दिली.

अनुपम पॉल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो 26 एप्रिलपासून फरार होता. त्रिपुरा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. 12) अनुपम याला दिल्लीत अटक केल्याचे सांगण्यात आले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. अनुपम याला त्रिपुराला घेऊन जाण्यात येणार असून, तेथे त्याची चौकशी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अनुपम याने 25 एप्रिल रोजी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात खोटी माहिती देणे, फसवणूक आणि षड्‌यंत्र रचणे आदी आरोप ठेवले आहेत. अशाच प्रकारची फेसबुक पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांनी याआधी सैकत तालापात्र या पत्रकाराला अटक केली होती. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com