माओवाद्यांकडून आमदार व माजी आमदारची भर चौकात हत्या

Maoists kill MLA and former MLA
Maoists kill MLA and former MLA

विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश)- माओवाद्यांनी एक आमदार व एक माजी आमदार यांच्यासह चौघांची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्या दोघांची भर चौकात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम जिल्ह्यात घडला आहे. जवळपास 50 माओवाद्यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर तेलगू देसम पार्टीचे एक आमदार आणि एक माजी आमदार यांच्यासह अन्य दोघांची हत्या केली आहे.

या घटनेने संपुर्ण आंध्रप्रदेश हादरुन गेले असून विशाखापट्टनम परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम जिल्ह्यातील तेलगू देसम पक्षाचे आमदार किडारी सर्वैश्वरराव आणि माजी आमदार सोमु हे दिनांक 23 सप्टेंबर रोजी जनसंपर्क दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जवळपास 50 सशस्त्र माओवाद्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि कार्यकर्त्यासमोरच त्यांना गोळया घालुन ठार केले.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये बॉक्साईडच्या काही खाणींचे उत्खनन होणार होते. परंतू माओवाद्यांचा त्या खाणप्रकल्पाला विरोध होता. या सगळ्याचा बदला घेण्यासाठीच माओवाद्यांनी भर रस्त्यात आमदारांची हत्या केली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com