मोदीजी, हुतात्मा जवानांचा बदला असाच घेणार का?

मोदीजी, हुतात्मा जवानांचा बदला असाच घेणार का?

नवी दिल्ली : सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला 20 अब्ज डॉलरची मदत करण्यात आली आहे. या देशाचे राजे सलमान भारत दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) तोडले. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'मोदीजी, हुतात्मा जवानांचा बदला असाच घेणार का?', असे ते म्हणाले.

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर जगभरातून पाकिस्तानावर टीका केली जात आहे. त्यातच आता सलमान यांनी पाकिस्तानला 20 अब्ज डॉलरची मदत केली. तसेच सलमान आता भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी राजशिष्टाचार तोडून त्यांची भेट घेतली. या भेटीवरून मोदींवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली. 

यावर सुरजेवाला म्हणाले, आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, की राजशिष्टाचार तोडून मोदींनी भव्य स्वागत केले. सलमान दहशतवादी पोषक असणाऱ्या पाकिस्तानला 48 तासांपूर्वी 20 अब्ज डॉलरची मदत देऊन आले आहेत. मोदीजी, पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांची आठवण अशाच पद्धतीने करत आहात का? तुम्ही सौदी अरेबियाला सांगून पाकिस्तानला दिलेली मदत परत घ्यायला सांगणार का? ही मदत हिंमत करून परत मागाल का?

तसेच मौलाना मसूद अझहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, ही भारताची मागणी फेटाळली गेली. त्यामुळे आता यावर प्रश्न विचारण्याची गरज आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com