ओडिशाच्या किनाऱ्याला 'दाये' वादळाची धडक 

ओडिशाच्या किनाऱ्याला 'दाये' वादळाची धडक 

भुवनेश्‍वर : ओडिशाच्या किनाऱ्याला आज "दाये' या चक्रीवादळाने धडक दिली. या वादळामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस पडत असून, मलकानगिरी या जिल्ह्याचा उर्वरित राज्याशी असलेला संपर्क तुटला आहे. या वादळामुळे जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. 
गिरी जिल्ह्याला "दाये' वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अनेक नागरिक अडकून पडले असून, आपत्तीनिवारण पथकाने आतापर्यंत दीडशे लोकांची वादळातून सुटका केली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले असल्याने या भागातील जवळपास सर्व मोठ्या रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. कालपासून (ता. 20) मलकानगिरी जिल्ह्यात 1163.8 मिमी पाऊस कोसळला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्‍यक ते आदेश दिले आहेत. वादळाचा फटका बसलेल्या भागांमध्ये गरजेच्या वस्तू वितरित करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यावरून पुढे सरकले असून, त्याची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मलकानगिरी, गजपती, गंजम, पुरी, रायागडा, कलहंडी, कोरापुत आणि नवरंगपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com