Pakistan issues postage stamps portraying slain militant Burhan Wani
Pakistan issues postage stamps portraying slain militant Burhan Wani

पाकच्या दृष्टीने बुरहान वाणी 'फ्रीडम आयकॉन'

पाकिस्तान : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात मारला गेलेला दहशतवादी बुरहान वाणीच्या सन्मानार्थ पाकिस्तानने टपाल तिकीट जारी केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांच्या गोळीबारात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो या तिकीटावर आहेत. 

काश्मीर स्वातंत्र्यासाठी भारतीय सैनिकांविरोधात लढल्याच्या सन्मानार्थ या दहशतवाद्यांचे फोटो पाकिस्तानच्या पोस्टाने टपालावर छापले आहेत. हा स्टॅम्प ई-बे आणि इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्टॅम्पची किंमत ८ रूपये आहे. तसेच, या जारी केलेल्या तिकीटावर बुरहान वाणीचा उल्लेख फ्रीडम आयकॉन असा करण्यात आला आहे. 24 जुलै रोजी कराची येथे हे पोस्टाचे तिकीट पहिल्यांदा जारी करण्यात आले. कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये डाक विभागाचे मुख्यालय आहे. लढ्यामध्ये आपण काश्मीरच्या लोकांसोबत असल्याचे दाखवण्यासाठी पाकिस्तानने स्टॅम्पवर बुरहान वाणीसह इतरांचे फोटो छापले आहेत.

दरम्यान, बुरहान वाणी हा एका काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. त्याचा भारतीय सैन्याने 08 जुलै 2016 रोजी खात्मा केला होता. यावेळी बुरहान वाणी व्यतिरिक्त भारतीय सैन्याने 7 दहशतवाद्यांना ठार केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com