...मग इम्रान खान Live का बोलले नाहीत?

imran khan
imran khan

नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा व्हिडिओ आज (मंगळवार) प्रसारीत करण्यात आला. पण, इम्रान खान लाइव्ह न बोलता त्यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखविण्यात आला. 6 मिनिटांचा व्हिडिओमध्ये 20 पेक्षा जास्त कट असून, तो अनेकदा एडिट केल्याचे दिसून येते.

इम्रान खान यांचा व्हिडिओ आज दुपारी दीड वाजता प्रसारीत करण्यात आला. 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये 1.40 सेकंद, 1.48 सेकंद, 1.55 सेकंदावेळी एडिट केल्याचे दिसून आले. शिवाय, संपूर्ण व्हिडिओ दरम्यान 20 पेक्षा जास्त वेळा कट केल्याचे दिसून येते. पाकिस्तानचे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या लष्कराच्या पुढे बोलू शकत नाही. इम्रान खान हे कोणाताही निर्णय स्वःता घेऊ शकत नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटिझन्स व्यक्त करत आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्या लष्कराने मदत केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

भारताने आमच्यावर हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ, असा पोकळ इशारा इम्रान खान भारताला देत आहेत. पण, एवढा इशारा देण्याएवढेही ते लाइव्ह बोलू शकत नाही का? असा प्रश्नही नेटिझन्स विचारत आहेत. इम्रान खान यांना नेटिझन्सनी ट्रोल केले आहे. ट्विटरवरही #ImranKhan हा ट्रेण्ड पहिल्या क्रमांकावर आला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पुरावे नसतानाही आमच्यावर आरोप केले आहेत. भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत नाही. दहशतवादाचा जास्त फटका पाकिस्तानला बसला आहे. भारताने उगाच पाकिस्तानवर आरोप करणे बंद करावे. भारताकडे पुरावा नसतानाही आमच्यावर आरोप केले आहेत. भारताने आमच्यावर आक्रमनाचा विचार करू नये. आमच्यावर हल्ला केला तर आम्ही सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देऊ,' असेही इम्रान खान म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com