भारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या

file photo
file photo

जयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या पाकिस्तानी कैद्याचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी देशभरातून होत आहे. कारागृहामधील कैदीही आक्रमक झाले आहेत. भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना आज घडली. पाकिस्तानी कैद्याची हत्या झाल्याची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पाकिस्तानी नागरिकांनो 48 तासांमध्ये चालते व्हा, असे बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी पाकिस्तानी नागरिकांना मंगळवारी (ता. 19) सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com