सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

PM Inaugurates Airport In Pakyong Sikkim Airport
PM Inaugurates Airport In Pakyong Sikkim Airport

गंगटोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता.24) सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी काल (ता.23) गंगटोकमध्ये दाखल झाले होते.

सिक्कीममधील या विमानतळाचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते. विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यास जवळपास 9 वर्षाचा कालावधी लागला आहे. हे सिक्कीममधील पहिले विमानतळ असून सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून हे जवळपास 33 कि.मी. अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 

काल (ता.23) मोदी आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ करुन सिक्कीमला रवाना झाले होते. ते रात्री उशिरा सिक्कीममध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी विमानातून स्वतः सिक्कीमच्या सौंदर्याचे घेतलेले अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. सिक्कीममधील या पहिल्याच विमानतळामुळे सिक्कीम आता हवाई वाहतुकीच्या नकाशावरही दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com