बेळगाव शहर विकास प्राधिकरण आयुक्तपदी प्रीतम नसलापुरे 

बेळगाव शहर विकास प्राधिकरण आयुक्तपदी प्रीतम नसलापुरे 

बेळगाव - बुडा (बेळगाव शहर विकास प्राधिकरण) आयुक्तपदी प्रीतम नसलापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नसलापुरे यांच्या बदलीचा समावेश असून, त्यांची बुडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

पाटबंधारे विभागात सध्या नसलापुरे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मध्यंतरी बुडा आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार होता. पण, बेळगावला जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. असताना त्यांनी नसलापुरे यांच्याकडील बुडाचा पदभार काढून घेऊन महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांच्याकडे दिला होता. राज्य शासनाने नवीन बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये नसलापुरे यांची बुडाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नसलापुरे लवकर पदभार स्वीकारतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com