...अन् राहुल गांधींनी बैठकीतूनच लावला मुख्यमंत्र्यांना फोन

...अन् राहुल गांधींनी बैठकीतूनच लावला मुख्यमंत्र्यांना फोन

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'अपनी बात राहुल के साथ' या अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील छोट्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान राहुल गांधींनी व्यवसायाच्या निगडित अडचणींची माहिती घेतली आणि या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाच फोन केला. 

राहुल गांधी यांनी लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांसोबत दुपारचे जेवण केल्यानंतर त्यांनी चर्चा केली. याबाबत इंदूरचे व्यावसायिक संजय पटवर्धन यांनी सांगितले, की राहुल गांधी या बैठकीत आले होते. त्यांचे या बैठकीत उपस्थित राहणे, ही एक आश्चर्यकारक बाब होती. त्यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या समाधानाबाबत विचारले. तसेच खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळांमध्ये खादी गणवेश बंधनकारक करण्यात यावा, अशी सूचना आली. या सूचनेनंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना त्वरीत फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान, राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवरून म्हणणे मांडल्यानंतर व्यापाऱयांनी यावर समाधान व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com