'मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी'

Raj Thackrey Creates Cartoon And Criticise Modi And Amit Shah again
Raj Thackrey Creates Cartoon And Criticise Modi And Amit Shah again

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राज यांनी व्यंगचित्र रेखाटताना मोदी आणि अमित शहा यांना संघाच्या वर्गाबाहेरचे स्वयंसेवक दाखवले आहे, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था आपल्या पायाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे राज यांना त्यामध्ये सूचित करायचे आहे. तर, एक स्वयंसेवक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात दिलेले भाषणाचे स्मरण करत असल्याचे दाखवले आहे. आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मालकी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विविध विचारांचे अदान प्रदान केले जाते, असे भागवत यांनी सांगितले होते. त्यावर, संघातील स्वयंसेवक म्हणतो की, भागवतजी आम्हाला आजपर्यंत संघातील शाखेत तुम्ही म्हणत आहात तेच शिकवले गेले आहे. मग या दोघांना म्हणजेच मोदी आणि शहा यांना ते शिकवलं गेलं नाही का ? हे दोघे आपली लोकशाही विसरुन का वागत आहेत, आपली व्यवस्था पायाखाली आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न त्या स्वयंसेवकांने भागवतांना केला आहे, अशा स्वरुपातील व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. 

हे व्यंगचित्र साकारल्यानंतर राज यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकांउट आणि ट्विटरवरुन ते प्रकाशित केले आहे. तर, हे प्रकाशित करताना राज यांनी संघासंबधित दोन आणि नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत हे हॅशटॅग वापरले आहेत.

दरम्यान, राज यांनी गणपती उत्सावारुनही मोदी आणि अमित शाह यांना टार्गेट केले होते. राज यांनी मोदी यांना प्रसिद्धीविनायकाची उपमा दिली होती आणि त्यांनी अशा आशयाचे व्यंगचित्र मंगळवारी (ता.18) रेखाटले होते. राज हे मोदी, शहा आणि भाजप यांच्यावर सातत्याने व्यंगचित्रातून टीका करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com