Girish Karnad
Girish Karnad

कार्नाड अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील : मोदी

नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशी श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली.

ज्येष्ठ अभिनेते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचे आज निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान असलेले व धर्मनिरपेक्ष तत्वांशी बांधिलकी कायम राखणारे तसेच हिंदुत्ववादी संघटनांबरोबरचे आपले मतभेद उघडपणे थेट मांडणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. 

कार्नाड यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कार्नाड यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. आता राजकीय, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com