तृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले

trupti desai
trupti desai

कोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोची विमानतळावर पोचल्या खऱ्या पण, पोलिसांनी त्यांना विमानतळावरच रोखले असून लॉर्ड अयप्पा मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसापासून शबरीमलवरून देशभर वातावरण तापले आहेत. येथील मंदिरात फक्त पुरूषांना प्रवेश देण्यात येतो तर महिलांना नाही. पुरूषांप्रमाणे महिलांनी प्रवेश मिळावा यासाठी पुरोगामी संघटना आग्रही आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या मुद्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतापही व्यक्त करण्यात येत होता.

 महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. शनीशिंगनापूरला महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन छेडले होते. आता त्यांनी थेट शबरीमलकडे कूच केली असून महिलांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी त्या आग्रही आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देसाई आणि त्यांचे सहकारी कोचीतील विमानतळावर पोचले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

 यावेळी विमानतळावर तणाव निर्माण झाला होता. देसाई यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंदीराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जावा असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र परंपरेनुसार अद्यापही महिलांना प्रवेश नाकारला जात आहे. तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकार्याना मंदीरात दर्शन घ्यायचे नसून तणाव निर्माण करायचा आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. देसाई आज कोचीत दाखल होणार असल्याचे समजताच पोलिसांनी येथील विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com