तुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान

You are my master my high command PM Modi says in Varanasi
You are my master my high command PM Modi says in Varanasi

वाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती देणार आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच वाराणसीला पूर्व भारताचे प्रवेशद्वार बनविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. 
 
पंतप्रधान मोदी वाराणसी येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन पंतप्रधान मोदी संसदेत गेले आहेत. या मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, ''तुम्ही मला पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली आहे. तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात खासदार म्हणून काय केले याची माहिती देणे गरजेचे आहे. वाराणसीचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत''.

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी उत्तरप्रदेशातील वाराणसी आणि गुजरातच्या वडोदरा येथून निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांना विजय मिळाला. मात्र, त्यांनी वाराणसीतून लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचे ठरवले. त्यामुळे येथील जनतेशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कामांचा हिशेब आणि केलेल्या विकासकामांची माहिती देणार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com