आईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप

गोंदिया - अनाथ मुलामुलींसह उपस्थित मान्यवर.
गोंदिया - अनाथ मुलामुलींसह उपस्थित मान्यवर.

गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु, आईवडिलांचे छत्र हिरावलेल्या अनाथ बालकांनासुद्धा या सर्व गोष्टींचा आनंद मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी पुढाकार घेतला अन्‌ अनाथ बालकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्‍यासह अन्य ठिकाणच्या ४२ अनाथ, वंचित, गरीब मुलांना वेळोवेळी अन्नधान्यासह किराणा सामान, शालेय साहित्य व इतर आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बेदरकर वेळोवेळी दानदात्यांच्या सहकार्याने करीत असतात. इतर मुलांप्रमाणे अनाथ मुलांची दिवाळी आनंदाची जावी, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे, या हेतूने गोंदिया शहरातील विविध दानशुरांच्या मदतीने बेदरकर मागील काही वर्षांपासून आपल्याच निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा दिवाळी मनोमीलनाचा एक  अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवीत आहेत. नुकताच हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या वेळी अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा मांडोदेवी देवस्थानचे सचिव विनोद अग्रवाल, माजी सभापती आरती चवारे, शिक्षक अनिल मेश्राम, सृजन सामाजिक संस्थेचे विजय ठवरे, वसिष्ठ खोब्रागडे, वरुण खंगार, प्रणाली ठवरे, पूजा खंगार, त्रिशा खंगार, सुनीता खोब्रागडे आदी उपस्थित होते. संचालन सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी केले.

जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ४२ अनाथ, वंचित, गरीब मुलामुलींच्या चंद्रमोळी झोपडीत  सुखशांती आनंदाचा झरा पाझरावा यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या अनाथ बालकांना नवीन कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट, शालेय साहित्य, दिवाळीचा गोड फराळ व रोख रक्कम देण्यात आली.

दानशूर आले पुढे...
चिमुकल्यांना मायेचा हात देण्यासाठी गोंदियातील अनेक दानशूर पुढे आले. यात डॉ. राजेंद्र जैन, डॉ. निमगडे, सई अभिमन्यू काळे, विनोद अग्रवाल, आरती चवारे, सुनील केलनका, भरत क्षत्रिय, सोंटू जैन, सुनील तरोणे, अजय जायस्वाल, शारदा सोनसावरे, मीना डुंबरे, वुमेन्स विंग, पशिने, सुनंदा बिसेन, मधू बन्सोड, सीमा डोये, लता बाजपेयी, डॉ. सचिन चौधरी, डॉ.छाया लंजे, डॉ. दिशा गेडाम, पौर्णिमा मिश्रा, कनक सोनकवरे, पूजा खंगार, विजय बहेकार, ॲड. भौतिक आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com