वावे गावातील उपक्रम, तीनशे किलो निर्माल्याचे करणार खत

pali
pali

पाली - आपल्या लाडक्या बाप्पाच विसर्जन करताना सोबत जे निर्माल्य नदीमध्ये विसर्जन करतो, ते करताना बऱ्याच वेळा सोबत प्लास्टिक पिशव्या देखील नदीत व तलावात टाकल्याने पाणी दूषित होते. यावर सुधागड तालुक्यातील वावे गावातील तरुणांनी मिळून नामी शक्कल लढविली. त्यांनी पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी सर्व निर्माल्य व त्याबरोबर आलेल्या प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या. या जमा केलेल्या निर्माल्याचे खत केले जाणार आहे आणि प्लास्टिक पिशव्या विघटनासाठी देण्यात येणार आहेत. 

निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दूषित होते. ते मानवी व प्राण्यांच्या आरोग्यास धोकादायक असते. त्यामुळे गणेश विसर्जना पूर्वी यावर उपाय योजना करण्याचा वावे गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन निर्धार केला. प्लास्टिक पिशव्यांमधुन आलेल्या निर्माल्यातून प्लास्टिक वेगळं आणि निर्माल्य वेगळ करण्याचे ठरले. त्यानुसार विसर्जनावेळी लोकांचे प्रबोधन केले. त्यांच्याकडून निर्माल्य आणि प्लास्टिक पिशव्या जमा केल्या. सर्व लोकांनी देखील खूप चांगले सहकार्य केले. यावेळी साधारण 400 प्लास्टिक पिशव्या आणि अंदाजे 300 किलो निर्माल्य गोळा केले गेले. या निर्माल्यापैकी थोडे निर्माल्य प्रतिनिधिक स्वरुपात सर्वांच्या वतीने नदीमध्ये राहुल म्हसके यांच्या हस्ते सोडण्यात आले. उर्वरित सर्व निर्माल्याचे खत बनविण्यात येणार आहे. आणि प्लाटिकच्या पिशव्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या रिसाइकल करण्यासाठी पाठविल्या जाणार आहेत. यावेळी केतन, धनंजय, राजेश, महेंद्र, संदेश, ओमकार, शुभम (सर्व म्हसके), तुषार शिंदे, प्रतीक पडवळ आणि संदीप हिर्डेकर या तरुणांसह गावातील इतर तरुण व ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली.  

कोणतेही सण आणि उत्सव पर्यावरण पूरकरित्या साजरे करणे आवश्यक आहे. बाप्पाच्या साक्षीने आम्ही हा पर्यावरण स्नेही उपक्रम राबविला. त्याला सर्व तरुण आणि गावकर्यांनी मोलाची साथ दिली. असे वावे गावातील तरुणांनी सकाळला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com