लेपा, सौंदाळ्यासाठी किनारी भागात नौकांचा धुमाकूळ

लेपा, सौंदाळ्यासाठी किनारी भागात नौकांचा धुमाकूळ

रत्नागिरी - खोल समुद्रात मासळी मिळत नसल्याने अनेक मच्छीमारी नौका किनाऱ्यापासून काही अंतरावर येऊन मासेमारी करीत आहेत. लेपा, सौंदाळा यासारखे मासे मिळत असल्याने त्यातून उत्पन्न मिळविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. मात्र, गस्ती नौका नसल्याने मत्स्य विभागही त्यांच्यापुढे हतबल झाला आहे.

सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरू झाली. त्यानंतर अनधिकृत मासेमारी होत असल्याचे पुढे आले. बदलत्या वातावरणामुळे मालवण पट्ट्यात मासळी मोठ्या प्रमाणात सापडत आहे. अजूनही रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात मासळी सापडलेली नाही. थोडा बांगडा मिळत असल्याने त्याचाच आधार मच्छीमारांना आहे. गेल्या आठ दिवसांत मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका फेरीला किमान अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. 

मासळीच मिळत नसल्याने मच्छीमारांचा अर्धाअधिक खर्च वाया जात आहे. मच्छीमारी नौकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परजिल्ह्यांतील मच्छीमारांचा धुमाकूळही सुरूच आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही मच्छीमार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गस्त नौका नसल्याने बंदरावर आल्याशिवाय त्यांना कारवाईचा बडगा उगारता येत नाही. काही मच्छीमार रात्रीच्यावेळी बंदरावर दाखल होतात. किनारी भागात येऊन मासेमारी करणाऱ्यांना चार ते पाच टप लेपा, सौंदाळा मिळत आहे.

व्हीटीएसवरून थेट कारवाई
व्हीटीएस मशिन लावलेल्या दीडशेहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यांनी बारा नॉटीकल मैलाच्या आत मासेमारी केल्याचे निदर्शनास आले, तर त्यांचे ठिकाण पाहून केंद्रीय पातळीवरून कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वी दोन मिनी पर्ससीननेटवाल्यांवर कारवाई झाली होती; परंतु व्हीटीएस न लावलेल्या आणि कागदपत्रांविना असलेल्या शेकडो नौकांवर कुणाचाच अंकुश नाही, अशी खंत मच्छीमारांकडून व्यक्‍त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com