राम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर

pali
pali

पाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद मृत्यू झाला होता. राम बावधाने या तरुणाची आत्महत्या नसून तो घातपात आहे. पुर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाली असल्याचा गंभीर आरोप बावधाने कुटुंबियांनी केला आहे. राम बावधाने याच्या गुढ मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांनी आश्वासन दिले.

रायगड पोलिस अधिक्षक व पाली पोलिस स्थानकांत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या प्रकरणाच्या मुळाशी जावून सखोल चौकशी करण्यात यावी व झालेल्या घातपाताचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पिडीत कुटुंबिय व ग्रामस्तांनी राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना दिले. यावेळी राम बावधाने याच्या गुढ व संशयास्पद मृत्यूबाबत लवकरच चौकशी समिती नेमण्याबाबतचे आदेश देणार असून, उपलब्ध अहवालानुसार पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे केसरकर यांनी बावधाने कुटुंबियांना सांगितले.

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे, २३ सप्टेंबर २०१८ रोजी वारसबोडण धनगरवाडा येथील रहिवाशी असलेले नामदेव उर्फ राम बावधाने याला गावातील काही संशयीतांनी बाहेर बोलावून निर्जनस्थळी नेले. त्यास बळजबरीने विषारी औषध पाजून ठार मारले असल्याचा आरोप बावधाने कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाली पोलिस स्थानकातून एफआयआरची प्रत दिली नसून, सदर प्रत देण्याबाबतचे आदेश देण्यात यावेत. तसेच राम बावधाने याच्या गुढ मृत्यूचा तपास करुन याप्रकरणात कट रचणारे व कटात दोषी आढळणार्‍या संशयीत सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पिडीत बावधाने कुटुंबियांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी साहू बावधाने, गंगाराम बावधाने, झिमा बावधाने, कोंडू बावधाने आदिंसह कुटुंबिय उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com