कारखान्यातून आठ लाखांची रसायन चोरी, तिघे अटक

crime
crime

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातून आठ लाख रुपये किंमतीच्या सिल्व्हर नायट्रेट या उत्प्रेरकची चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे महाड औद्योगिक क्षेत्रात रसायन चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड होत आहे.

या प्रकरणी कंपनाचे अधिकारी प्रविण बांथरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातून 1 जानेवारी 2017 पासुन 16 एप्रिल 2018 दरम्यान कंपनीतील वेअर हाउस मधून एकूण 8 लाख रुपये किमतीचे सिल्व्हर नायट्रेट हे उत्प्रेरक चोरीला जात होते. यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. अखेर पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटिल यांनी याचा छडा लावला. कारखान्यातील कंत्राटी कामगार अक्षय जाधव (रा.पारमाची) तसेच अजित जाधव (रा.माझेरी) व प्रविणकुमार पात्रा (रा.ओरीसा) या तिघांनी संगनमताने ही चोरी केली.  

अजित व प्रविणकुनार कारखान्यातून रोज चोरलेले रसायन अक्षय जाधवकडे देत व अक्षय ते बाहेर विकत असल्याचे पुढे आले आहे.या तिघांना पोलिसांनी 18 सप्टेंबरला अटक केली. महाड एमआयडिसीत यापूर्वी एम्बायो कंपनीतून साठ लाखाचे प्लॅटिनम चोरी प्रकरणी बारा जण अटकेत होते तर एमआयडीसीतील रसायनांचा या चोरीत कामगार व काही मातब्बर सामिल असल्याची चर्चा आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक एस.एम.मधाळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com