दादर-रत्नागिरी पॅसेंजर प्रवाशांनी रोखली

railway
railway

रत्नागिरी : गणेशोत्सव आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांनी कोकण रेल्वेला दणका दिला. दादर रत्नागिरी पॅसेंजर मध्ये जागा ना मिळाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी 5 तास आरक्षित डब्यात ठिय्या केला. प्रवासी बाहेर न आल्यामुळे गाडी रत्नागिरी स्थानकातच थांबून राहिली होती. पोलिस बळाचा वापर करण्याच्या भूमिकेनंतर प्रवासी आरक्षित डब्यातून उतरले आणि पर्यायी गाडीत जाऊन बसले. त्यानंतर दादर पॅसेंजर दादर कडे रवाना झाली.
सकाळी 5.30 वाजता सुटणारी पेंसेंजर 9 वाजता मुंबईकडे रवाना झाली. 
मडगाव रत्नागिरी ही गाडी सकाळी दादर रत्नागिरी म्हणून सोडण्यात येते.

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकात आहे. पॅसेंजरसाठी मध्यरात्री 2 वाजल्या पासून रत्नागिरी स्थानकावर येऊन बसले होते. मडगाव वरून आलेली गाडी आधीच भरून आली होती. त्यामुळे रत्नागिरीकरांसाठी डब्यात बसायला जागाच नव्हती. अनेक प्रवाशांनी खेड, संगमेश्वर स्थानकाला आरक्षित डब्यात प्रवेश केला. मात्र गाडी सुटण्यापूर्वी रेल सुरक्षा विभागाकडून त्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आवाहन केले. तिथूनच प्रवाशी आणि रेल प्रशासन संघर्ष सुरु झाला. मडगाववरून आलेल्या प्रवाशांना बाहेर काढा मगच आम्ही बाहेर पडू असा पवित्र प्रवाशांनी घेतला. या गाडीतून हजारो प्रवासी होते. तर त्या आरक्षित डब्यात साधारण तीनशे ते साडेतीनशे प्रवासी होते. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत चाकरमान्यानी रेल्वे रोखून धरली.

आरक्षित डबे रिकामे केल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला गाडी सोडता येत नव्हती. संगमेश्वर, खेडमध्येही असाच गोंधळ होण्याची भीती होती. नेतृत्व करणाऱ्या काही तरुण प्रवाशांना रेल पोलिसांनि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणला पकडायला गेलेल्या रेल पोलिस आणि प्रवासी यांच्यात झटपट झाली. प्रवाशांनी त्यांना रोखून धरले. या प्रकारामुळे प्रवासी आणखीन संतापले. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. 

पॅसेंजर राखडल्यामुळे अन्य गाड्यांच्या वेळापत्रका वर परिणाम होत होता. अखेर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पोलीस आणि विशेष दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. आरक्षित डब्यात बसलेल्या प्रवाशांना पोलिसी बळाचा वापर करून बाहेर काढण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ काही प्रवाशांना हटकले. 

पोलिसांच्या कारवाईला घाबरून लहान मुलं, वयस्कर महिला याना सांभाळत प्रवासी नाईलाजास्तव बाहेर पडले. रेल अधिकारी, रेल्वे पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांनी केरळ संपर्क क्रांती गाडीतील रिकाम्या डब्यात व्यवस्था केली. तब्बल 5 तासानंतर ही गाडी दादरकडे रवाना झाली.

या निमित्ताने रत्नागिरी दादर पेंसेंजर चा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यावर वेळीच उपाययोजना करायची गरज आहे. अन्यथा हा गोंधळ वारंवार होईल.
- सचिन रेमुळकर, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com