प्लॅटीनम पाठोपाठ एम्बायोत आता 15 लाखाची पॅलॅडियम कार्बनची चोरी 

Fifteen million Palladium Carbon theft at Amboyo Mahad
Fifteen million Palladium Carbon theft at Amboyo Mahad

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रामधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा याच कारखान्यातून 15 लाख रूपये किमतीचे 15 किलो पॅलॅडियम कार्बन हा उतप्रेरक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने औद्योगिक क्षेत्रात चोरट्यांनी आपले जाळे पसरवल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी एमआयडिसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2017 ते 14 सप्टेंबर 2018  कालावधीत ही चोरी झाली होती. एम्बायो कंपनी ही अंमली पदार्थ विभागाच्या नियंत्रणात येणा-या औषध निर्माण निगडित उत्पादन करत असते. या कारखान्यात यापूर्वी साठ लाख रुपयांच्या प्लॅटीनम चोरी प्रकरणी बारा जणांना अटक केली होती. ही चौकशी सुरू असतानाच उत्पादन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा 15 किलो पॅलॅडीयम कार्बन अधिक वापरला गेल्याचे कारखाना व्यवस्थापकांना आढळून आले. प्रत्यक्षात उत्पादन कोणतीही वाढ झालेली नव्हती. त्यामुळे या पदार्थांची चोरी झाली असावी अशी शक्यता गृहीत धरून या प्रकरणी चोरीची तक्रार कारखान्याचे व्यवस्थापक रमेश शिंदे यांनी दाखल केली त्यामुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅलॅडीयम कार्बन हा रासायनिक अभिक्रियेत उत्प्रेरक म्हणून वापरला जातो व त्याची किंमत एक लाख रुपये किलो आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत. अंमली पदार्थांशी निगडित हि उत्पादने असल्याने येथील रसायनांची चोरी करुन अन्य ठिकाणी समांतर उत्पादन प्रक्रिया केली जात असावी अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com