रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत

pali
pali

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 7 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. दुपारी दिड वाजेपर्यंत एकूण 31.50 टक्के मतदान झाले. 

सुधागड तालुक्यात पाली, कुंभारशेत, नागशेत, उध्दर, चिखलगाव, वाघोशी, नेणवली या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. दुपारपर्यंत पाली ग्रामपंचायतीत अवघे 13.39 टक्के मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. दुपारनंतर वाढत्या उष्म्यामुळे तुरळक गर्दी पहावयास मिळाली. 

ही मतदान प्रक्रिया पोलीसांच्या चोख बंदोबस्तात व प्रशासनाच्या योग्य नियोजनाद्वारे पार पडली. सुधागड तालुक्यातील सात ग्रामपंचायतीपैकी नागशेत, नेणवली व चिखलगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तसेच कुंभारशेत ग्रामपंचायतीत केवळ एका सदस्य पदासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. उध्दर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. वाघोशी ग्रामपंचायतीत एकूण 9 सदस्य संख्या असून सरपंचासह सदस्यपदासाठी निवडणुक पार पडली. सुधागड तालुक्यातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत व्हावे याकरीता पालीतील सर्व राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकला. मात्र अपक्ष उमेदवारांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. परिणामी पाली ग्रामपंचायतीसाठी 11 अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले. पाली ग्रामपंचायत सरपंचपदासह  2 सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रीया पार पडली. 

एकूण 15 प्रभागांमध्ये 20 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडली. या मतदान केंद्रात जिल्हा परिषदेच्या 16 शाळा तसेच पाली पंचायत समितीचे 2 बहुउद्देशीय केंद्र व ग.बा.वडेर हायस्कुलच्या 2 मतदान केंद्राचा समावेष आहे. 

मतदान प्रक्रीयेसाठी 110 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले. यामध्ये माध्यमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षक, तसेच पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार वैशाली काकडे, निवडणुक नायब तहसिलदार एन.टी.राउत तसेच महसुल व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेष होता. दरम्यान मतदानप्रक्रीयेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com