वाड्यातील चोरघेपाडा येथील कुपनलिकेला येते गरम पाणी 

wada.jpg
wada.jpg

वाडा : वाडा तालुक्यातील चोरघे पाडा (बिलोशी) येथील काळुराम राघो चोरघे या शेतकऱ्याच्या कुपनलिकेला गेल्या दहा बारा दिवसांपासून गरम पाणी येत असल्याने हा चर्चेचा विषय बनला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

चोरघेपाडा येथे एकूण 18 कुपनलिका आहेत. मात्र त्यापैकी फक्त काळुराम चोरघे यांच्या घराजवळील कुपनलिकेला गेल्या दहा बारा दिवसांपासून गरम पाणी येत आहे. या कुपनलिकेच्या पंधरा फुटांवर एक दुसरी कुपनलिका आहे. मात्र तिला थंड पाणी येत आहे. कुपनलिकेला गरम पाणी येत असल्याने हा चर्चेचा विषय बनला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुपनलिकेतील पाण्याची भूगर्भ तज्ञांनी पाहणी करावी अशी मागणी चोरघे यांनी केली आहे. 

 दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी येथे तीन दिवसांपूर्वी भुकंपाचे धक्के बसले. या भुकंपामुळेच हे पाणी गरम झाले असावे असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. भिंवडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी, गणेशपूरी, अकलोली व वाडा तालुक्यातील निबंवली येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. जग व देशभरात कुठेही भुकंप झाला तर कुंडातील पाणी अतिगरम होऊन कुंडे ओव्हरफ्लो होत असतात. हा आजवर अनेक झालेल्या भुकंपातून निष्पन्न झाले आहे. डहाणू येथील भुकंपाचा या कुपनलिकेशी काही संबंध आहे का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com