टक्केवारीचे माझ्यावरील आरोप हास्यापद - मंगेश लोके

टक्केवारीचे माझ्यावरील आरोप हास्यापद - मंगेश लोके

वैभववाडी - ज्या पक्षाचे राजकारण टक्केवारीवर चालते त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टक्केवारीचा आरोप करणे हास्यापद आहे, अशी टिका तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानचे तालुका सरचिटणीस बाळा हरयाण आणि जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेच्या पार्श्वभुमीवर श्री. लोके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजी रावराणे, स्वप्निल धुरी, दिलीप नारकर, अतुल सरवटे आदी उपस्थित होते.

श्री. लोके म्हणाले, ""वैभववाडीत झालेली सभा नेमकी कुणाची असा प्रश्‍न मी विचारला होता त्या प्रश्‍नाचे उत्तर स्वाभिमानच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी दिले नाही. याचा अर्थ त्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही असाच होतो. बाळा हरयाण यांना स्वाभिमान पक्षात सुत्रसंचालन करण्याव्यतिरिक्त काहीही स्थान नाही. नासीर काझीच्या नावावर त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुका जिंकल्या. हिंमत असेल तर यापुढे एक तरी निवडणुक त्यांनी जिंकुन दाखवावी.''

युवासेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल धुरी यांनी देखील श्री. हरयाण यांच्यावर जोरदार टिका केली. श्री. हरयाण यांनी तिथवलीचे सरपंच असताना घरकुल लाभार्थ्यांना कसे छळले याची माहीती सर्वाना आहे. त्यामुळे तिथवली सरपंच पदाचा भरलेला फॉर्म त्यांना पक्षाने मागे घ्यायला भाग पाडले. त्यामुळे टक्केवारीचे आरोप त्यांनी दुसऱ्यांवर करू नये. तिथवली ग्रामपंचायत स्वाभिमान पक्षाकडे आहे. गावातील सर्वाचा केसीसी कंपनीच्या उत्खननाला विरोध असताना कुणाच्या आर्शिवादाने हे सुरू आहे. ग्रामपंचायत कोणत्या कारणामुळे कारवाई करीत नाही याचेही उत्तर श्री. हरयाण यांनी द्यावे.

श्री. साठे हे भुईबावडा विभागाचे बुथप्रमुख
ज्यांनी नारायण राणेंचा पराभुत केले त्या आमदार वैभव नाईकांवर टिका करण्याची पात्रता भालचंद्र साठेची आहे का असा सवाल करीत श्री. साठे हे भुईबावडा विभागाचे बुथप्रमुख असल्याची टिका शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे यांनी केले.

फटक्‍याची भिती आम्हाला नको
फटाकेचे उत्तर फटक्‍यात देवू, असे आव्हान बाळा हरयाण यांनी आम्हाला देवु नये. जशास तसे उत्तर देण्याची तयारी शिवसेनेची आहे हे श्री. हरयाण यांनी विसरू नये, असे आव्हान देखील श्री. लोके यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com