दीपक केसरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा - राणे

खासदार नारायण राणे यांनी आज चिपी विमानतळास भेट देत कामांचा आढावा घेत पाहणी केली.
खासदार नारायण राणे यांनी आज चिपी विमानतळास भेट देत कामांचा आढावा घेत पाहणी केली.

चिपी - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला खासगी विमान उतरवून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा. पालकमंत्र्यांचे अधिकार केवळ जिल्हा नियोजन समितीपुरतेच मर्यादित असून त्यांचा या विमानतळाशी काय संबंध असा प्रश्‍न खासदार नारायण राणे यांनी येथे उपस्थित केला. 

दरम्यान विमानतळाचे काम तसेच आवश्यक परवानग्या याची पूर्तता येत्या दोन महिन्यात होणार असून डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत विमान वाहतूक सुरू होईल असेही श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मालवण दौर्‍यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज सकाळी चिपी येथे भेट देत धावपट्टी, पॅसेंजर टर्मिनलची पाहणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, अशोक सावंत, रेश्मा सावंत, रणजित देसाई, मंदार केणी, बाबा परब, यतीन खोत, मोहन वराडकर, आयआरबीचे राजेश लोणकर, जयंत डांगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषद झाली.

श्री. राणे म्हणाले, विमानतळासाठी केंद्र शासनाकडून डिजीसीएची आवश्यक परवानगी मिळवून दिली जाईल. शिवाय 2500 मीटरची धावपट्टी 3400 मीटरची होण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. विमानतळासाठी परुळे, चिपी, कुशेवाडा, कर्ली या चार गावातील ग्रामस्थांचे मोठे योगदान तसेच सहकार्य लाभले आहे. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांची समन्वय समिती स्थापन करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. या समितीची महिन्यातून एक बैठक घेत ज्या समस्या विमानतळ प्राधिकरणच्या अखत्यारित आहेत त्या दूर कराव्यात ज्या शासनस्तरावर सोडवायच्या आहेत त्याची माहिती आम्हाला द्यावी अशा सूचना त्यांनी आयआरबीच्या अधिकार्‍यांना केल्या.

विमानतळासाठी आवश्यक केबल टाकण्याच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. केबल वरून टाकायच्या असतील तर संबंधित जमीनमालकांना महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या दराप्रमाणेच मोबदला मिळायला हवा अशी ग्रामस्थांच्यावतीने माझी मागणी आहे. विमानतळाचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण होता नयेत यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री. राणे यांनी यावेळी केल्या.

प्रत्येक दिवशी विमान उतरणार
चिपी विमानतळाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर विमान वाहतूक सुरू होईल. या विमानतळावरून प्रत्येक दिवशी विमान वाहतूक सेवा सुरू राहील असे खासदार श्री. राणे यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com