पानशिल ते बारवाईपुला रस्ता धोकादायक

rasayni
rasayni

रसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल ते बारवाईपुला पर्यंतचा रस्त्याच्याकडेला वाढलेले गवत आणि झुडपांनमुळे रस्ता धोकादायक बनला आहे. वळण घेताना किंवा कडेचा अंदाज न आल्यामुळे वहान फसुन अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहे. 

वासांबे मोहोपाड्याहुन पानशिल मार्गे पनवेलकडे  जाण्यासाठी हा रस्ता जवळ असल्याने मोहोपाडा आणि परिसरातील गावाकडून दोन, तीन, चार चाकी हलक्या वहानांची वर्दळ असते. मार्गावरील पानशिल ते बारवाईपुल सुमारे तीन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्याकडेला ठिक ठिकाणी झाड झुडप वाढली आहे. जाताना वळणावर व दुस-या वहानांना साईड देताना कडेचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहे. 

दरवर्षी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत पावसाळा संपल्यानंतर गवत झुडप तोडुन टाकत आहे. मात्र या वर्षी अजुन काही हलचाली दिसत नसल्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. रस्त्याच्याकडेचे गवत व झुडप काढण्यात यावे आशी मागणी नामदेव पाटील यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com