शिवसेनेची मुजोरी मोडीत काढण्यासाठी रत्नागिरीत `यांना` उमेदवारी

शिवसेनेची मुजोरी मोडीत काढण्यासाठी रत्नागिरीत `यांना` उमेदवारी

रत्नागिरी - जनतेने शिवसेनेला बहुमत दिले होते. नगराध्यक्ष सक्षम असताना पक्षांतर्गत स्वार्थासाठी त्यांना राजीनामा देऊन जनतेवर पुन्हा निवडणूक लादली आहे. शिवसेनेचा या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. या शिवसेनेची मुजोरी मोडीत काढण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर असतील, अशी घोषणा शहर विकास आघाडीने केली.  

येथील हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषद झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर मुर्तूझा, कुमार शेट्ये, बसपचे राजेंद्र आयरे, काँग्रसचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण, स्वाभिमानचे शहराध्यक्ष संकेत चवंडे, राजन सुर्वे, मनसेचे अरविंद मालडकर आदी उपस्थित होते.  

रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष आणि १८ नगरसेवक असे जनतेने सेनेला बहुमत दिले. मात्र पक्षांतर्गत तडजोडीसाठी सेनेने नगराध्यक्ष राहुल पंडित यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. शिवसेनेने स्वार्थासाठी ही निवडणूक जनतेवर लादली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सुमारे ११ हजार मते घेतली होती. लोकसभेला स्वाभिमानला चांगली मते मिळाली आहेत. काँग्रेस, मनसे, बहुजन विकास पार्टी अशी मिळून १७ हजारांवर मते पडली, तरी आम्ही निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे. जनतेच्या मताचा अनादर करणाऱ्या सेनेला या निवडणुकीत नक्की अद्दल घडवू.

त्यासाठी शहरामध्ये सव्वा वर्षात मोठे काम केलेले माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची सर्वांनुमते निवड झाली असून शहर विकास आघाडीचे ते उमेदवार असल्याचे आम्ही आज जाहीर करतो, अशी पदाधिकाऱ्यांनी घोषणा केली. शहरातील खड्डे, सुधारित नळपाणी योजना, जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था आदी प्रश्‍नांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी फिल्टर होत नाही
शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीच शुद्ध होत नाही. फक्त क्‍लोरिन मिक्‍स करून पाणी सोडले जात आहे. काही बेल्ट बंद आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळले जाते. आम्ही पाणी नमुने घेऊन ते तपासण्याचा निर्णय घेतला आहे, असे आघाडीतर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com