हिरावली रत्नागिरीकरांची हक्काची पॅसेंजर 

हिरावली रत्नागिरीकरांची हक्काची पॅसेंजर 

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरुन रत्नागिरीकरांसाठी एकमेव हक्काची दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर आहे. तीही दोन वर्षांपूर्वी मडगावपर्यंत नेण्यात आली. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्‍काची गाडी हिरावली आहे. सुट्टीमध्ये मडगावहून प्रवासी भरुन गाडी येते. त्यामुळे रत्नागिरीकर प्रवाशांची पंचाईत होते. याकडे वारंवार लक्ष वेधूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. 

गणपती, दिवाळीसह, ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. त्यांचे नियोजन मुंबईतूनच केले जाते. बहुतांश गाड्या मुंबईमधून सुटतात आणि मडगावला शेवटचा थांबा. नियमित गाड्यांमध्ये दादर-रत्नागिरी स्थानिकांसाठी, तर सावंतवाडी-दिवा आणि तुतारी एक्‍स्प्रेस सिंधुदुर्गवासीयांना उपयुक्‍त ठरते. पॅसेंजर ही रत्नागिरीतून सुटणारी एकमेव गाडी. त्याचा संगमेश्‍वर, चिपळूण, खेडमधील प्रवाशांचा आधार आहे. तीन वर्षांपूर्वी ही गाडी मेंटेनन्सच्या कारणास्तव मडगावपर्यंत नेण्यात येऊ लागली. त्याला प्रचंड विरोध झाला; परंतु प्रशासन त्यावर ठामच राहिले. त्याचा फटका सुट्ट्यांच्या कालावधीत बसू लागला. 

ही गाडी मडगावहून सायंकाळी सुटते आणि रात्री 2 वाजता रत्नागिरीत येते. ती मग रत्नागिरी-दादर म्हणून नेण्यात येते. सुट्टीत मडगावपासून प्रवासी या गाडीने रत्नागिरीत येतात. गाडीतून न उतरता पुढील प्रवासाला निघतात. त्यामुळे स्थानिकावर अन्याय होतो. परिणामी प्रवाशांमध्येच वादाला तोंड फुटते. पुढे गाडीत प्रवाशांना जागाही मिळत नाही. दरवर्षी हाच प्रश्‍न निर्माण होतो. ही गाडी पुढे न चालविता रत्नागिरीमध्येच ठेवावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठविणे गरजेचे आहे. 

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे रत्नागिरीतून सोडावी अशी मागणी माजी रेल्वेमंत्री तथा वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आजच केली आहे. गणेशोत्सवासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.
- सचिन वहाळकर,
प्रवासी संघर्ष समिती, कोकण रेल्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com