चिपळूणच्या आमदारांचे समाजोपयोगी काम दाखवा - शेखर निकम

चिपळूणच्या आमदारांचे समाजोपयोगी काम दाखवा - शेखर निकम

चिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली. 

संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सावर्डे येथे झाला. यावेळी मार्गदर्शन करताना निकम यांनी लोकसभेतील 57 हजाराचे मताधिक्य तोडून मी विधानसभा निवडणूकीत निवडून येणार असे सांगितले.

श्री. निकम म्हणाले, मी निवडणूकीसाठी उभा राहणार आहे. पण माझा उद्देश आमदार होणे नाही, तर लोकांची आर्थिक शैक्षणिक उन्नती करणे आहे.  

निकम म्हणाले मी हे करणार....

  • बेरोजगार तरुणांना कोकणातच रोजगार मिळवून देणार
  • कसबा येथे पर्यटनवाढी साठी प्रयत्न करणार
  • संभाजी महाराजाचे अद्यावत स्मारक करणे जेणेकरून तेथील उद्योग धंद्यांना चालना मिळेल.
  • पांडव कालीन मंदिरांचे सुशोभीकरण करणार
  • पाण्या संदर्भात ठोस उपाय योजना करणार
  • मुलांना कला क्रीडामध्ये पुढे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देणार

या वेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष एकनाथ साळवी, माजी सभापती विजय गुजर, मुंबई विभागाचे अध्यक्ष रमेश कानवले, रत्नागिरी बँकचे संचालक राजू सुर्वे, महिला अध्यक्षा दुर्वा वेल्हाळ, सईद खलपे आणि कसबा पंचायत समिती, मुचरी पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मुचरी पंचायत समिती गणातून शेखर निकम यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात करण्यात आला. कसबा आणि मचुरी गावातील शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com