एक संघर्ष समाजसेवा ग्रुपची शिवरायांना अनोखी मानवंदना

pali
pali

पाली - येथील शिवाजीमहाराज स्मारक जे पालीची जुनी ओळख आहे. हे खूपच जीर्ण झालेली झाडे झुडपे आणि अस्वच्छता यामुळे आत काय आहे हेच कळत नव्हते. "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या गृपमधील सदस्यांची नजर तेथे पडली… सगळ्यांना साद घातली गेली.. अन बघता बघता चाळीस पन्नास सदस्य गोळा झाले त्यांना ग्रामस्थांची साथ मिळाली. लोकसहभागातून स्मारकाची पुनर्रउभारणी व शुशोभिकरण करण्यात आले. अवघ्या सर्वांनी वर्षभरात स्मारकाचा कायापालट केला. 

मागील वर्षी जानेवारी महिन्यात शिवस्मारकाच्या कायापालटासाठी जातपात, धर्म विसरुन अगदी लहानग्यांसह मोठ्यांनी देखिल हातात झाडू, फावडे, कुदळ, कोयता, झाड छाटण्याची कात्री आदी सामग्री घेवून कंबर कसुन कामाला सुरुवात केली. कोणी संपुर्ण स्मारकाची व बाजुच्या परिसराची सफाई केली. रात्री सुद्धा सदस्यांचा उत्साह कमी होत नव्हता. 

यापुढे पैशांची जमवाजमव सुद्धा सुरु झाली. स्मारकाची रंगरंगोटी, शिव पुतळ्याची व ढालीला रंगविणे, कारंजे, जाळी व बाकडे बसविण्याचे, सुशोभिकरण करण्याचे झाडे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. त्यासाठी सर्वचजण आपआपल्या परिने कामाला लागले. आणि अवघ्या वर्षभरात स्मारकाचा सर्वस्वी कायापालट झाला. स्मारकाची रंगरंगोटी, साफसफाई बागेची देखभाल वेळच्या वेळी संघर्ष ग्रूपचे मावळे करत आहेत. तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सुध्दा सहकार्य करीत आहे. सकाळ देखील बातम्यांच्या माध्यमातून यांच्या कार्याची दखल घेत आहे.

स्मारकासाठी पदरमोड
स्मारकाच्या साफसफाईवर न थांबता ग्रुपच्या सदस्यांनी पदरमोड करत स्मारकाचा कायापलट करण्यास सुरुवात केली. सर्वांनीच आपआपल्या परिने पैसे स्वरुपात मदत केली. तर काहिंनी स्मारकाच्या कंपाऊडसाठी जाळी, लाद्या व लोखंडी पाईप दिल्या. काहींनी वाळू, सिमेंट, माती व झाडे दिली, रंग पुरविला, बाकडे दिले. याबरोबर काहींनी कुठलीही मजुरी न घेता रंगकामासाठी, वेल्डिंगसाठी पुढाकार घेतला. कामासंदर्भात रोज संध्याकाळी एकत्र येवून आढावा घेतला जात होता. आणि त्यानुसार नियोजन केले जात होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com