भारतीय संघात निवड न झाल्याने 'हा' युवा खेळाडू नाराज

Shubhman Gill
Shubhman Gill

अँटिगा : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याबद्दल मधल्या फळीतील फलंदाज शुभमन गिल याने नाराजी दर्शवत, यापुढेही मी माझे काम करत राहणार असे म्हटले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यात तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात नवदीप सैनी आणि राहुल चहर या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. मात्र  या मालिकेत भारताचा युवा खेळाडू शुभमन गिलला स्थान देण्यात आलेले नाही. 

क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत गिलने म्हटले आहे, की मी रविवारची वाट पाहात होतो की भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मला विश्वास होता की माझी संघात निवड होईल. मात्र एकाही संघात मला स्थान मिळाले नाही, त्यामुळे मी नाराज होतो. पण मी माझे काम करत राहणार, या गोष्टींवर विचार करत बसणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com