#NavDurga हातावरील मेंदीचा नाही गेला रंग नवी नवरी गिर्यारोहणात दंग

Priyanka-Chinchorkar-Mane
Priyanka-Chinchorkar-Mane

पुणे - नववधू प्रिया मी बावरते असे गाणे प्रसिद्ध आहे, पण पूर्वाश्रमीची प्रियांका चिंचोरकर यास अपवाद ठरली. एव्हरेस्टसह चार अष्टहजारी शिखरे सर केलेल्या आशिष माने याच्याशी विवाह झाल्यानंतर दोन आठवड्यांत ती लाहौल-स्पिती विभागातील बडा शिगडी मोहिमेवर गेली. तिने या मोहिमेत शिखरही सर केले.

चाकण परिसरातील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी, लग्नाची धामधुम आणि मग मोहिमेसाठी शारिरीक तयारी अशा तीन आघाड्यांवर लढणाऱ्या प्रियांकासाठी सासु अर्थात  आशिषच्या आई रेखा यांचा पाठिंबा मोलाचा ठरला.  रेखा यांनी सांगितले की, मुलांना जे आवडते, ज्यात त्यांचेे मन रमते ते करू द्यावे.

प्रियांकाने लोणावळा परिसरातील नागफणी, जुन्नरजवळील हडसर किल्ला येथे प्रस्तरारोहण केले आहे. यंदा सात जुलै रोजी तिचा विवाह झाला. त्यानंतर 21 जुलै रोजी ती गिरीप्रेमीने आयोजित केलेल्या बडा शिगरी मोहिमेसाठी रवाना झाली. चार ऑगस्ट रोजी तिने शिखर सर केले. या अनुभवाविषयी ती म्हणाली की, आम्ही तयारी कसून केली होती. समिट अटेम्प्टला जाण्याआधी शेर्पांनी हवामानाचा प्रतिकूल अंदाज व्यक्त केला. त्यावेळी दडपण आले होते. आम्ही संपर्क साधू शकत होतो. त्यामुळे घरून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. शिखर सर केल्यानंतर सुखरूप घरी परत यायचे होते. अशावेळी मोहिम यशस्वी झाली याचा आनंद आहे.

आशिषने प्रियांकाच्या गिर्यारोहणाला पाठिंबा देण्याचा आणि भविष्यात एकत्र मोहिमा करण्याचा मानस व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com