राज्यात एक तरी जागा रिपाइंला द्या - आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

औरंगाबाद/जालना - लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईची जागा भारतीय रिपब्लिकन पक्षाने मागितली होती; मात्र भाजप-शिवसेनेच्या झालेल्या युतीत रिपाइंला वाऱ्यावर सोडून परस्परांत जागा वाटप केले. आता किमान ईशान्य मुंबईसाठीतरी गांभीर्याने विचार करावा आणि एक तरी जागा रिपाइंला द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांची यासंदर्भात लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जालना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आज साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही खंत व्यक्त केली.

औरंगाबादमध्येही सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आठवले म्हणाले, ‘‘वंचित बहुजन आघाडीमुळे होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होणार आहे. परिणामी, रिपाइंकडे दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २५) राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. काँग्रेससोबत जाणार नाही. अडचणीत आणण्याचे काम भाजपने केले आहे. माझ्या समाजासमोर जाण्याची संधी त्यांनी मला दिली पाहिजे. कमळावरही निवडणूक लढवणार नाही. रिपाइंच्या मान्यतेसाठी स्वपक्षाच्या चिन्हावरच लढू. रावसाहेब दानवे यांच्याशीही बोललो. ते फिटिंग करणार आहेत,’’ असेही त्यांनी आपल्या शैलीत सांगितले.

आंबेडकरांच्या विरोधात नाही
‘‘भाजपसोबत आल्यापासून मोदींची भूमिका उघडपणे देशभर इमानदारीने मांडतो आहे. रिपाइंने वर्ष २०१४ मध्ये लढवलेल्या विधानसभेच्या आठ जागाही शिवसेनेकडे गेल्या आहेत. मला हवी असलेली दक्षिण-मध्य मुंबईची जागाही त्यांच्याकडेच आहे. बाळासाहेबांनी सांगितलेली शिवशक्ती-भीमशक्तीची भूमिका ध्यानात घेऊन उद्घवजींनी मोठे मन करावे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नसल्याचे स्पष्ट करीत प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढवणार नाही,’’ असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com