आघाडीच्या प्रचाराचा आज फुटणार नारळ

आघाडीच्या प्रचाराचा आज फुटणार नारळ

नांदेड -  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) व मित्रपक्षांची बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाचला नांदेडला पहिली संयुक्त प्रचारसभा होत असून, या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ‘पीआरपी’चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्यासह दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

येथील इंदिरा गांधी मैदानावर होणाऱ्या या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार डी. पी. सावंत आदी उपस्थिती राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com