Loksabha 2019: मोदींना दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करण्याची सवय - शरद पवार 

sharad-pawar
sharad-pawar

उल्हासनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा संसार नाही ते दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करतात असा टोमणा शरद पवार यांनी मोदींना मारला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उल्हासनगर शहराचे नोटबंदी आणि जीएसटी मुळे कंबरडे मोडले असून, हीच परिस्थिती देशाची आहे. देश देशोधडीला लागला आहे. अशी टीका मोदी सरकारवर केली आहे.

मोदी नेहरूंवर टिका करतात, पण याच पंतप्रधान नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कारखाने आणले. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला नमवले. राजीव गांधीनी दूरचित्रवाणी, संगणक आणि मोबाईल तंत्रज्ञान आणले. मोदींनी नोटबंदी आणून देशाची वाट लावली, असे ही शरद पवार म्हणाले.

भारत देशाने लोकशाही टिकवली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष हे भारताच्या निवडणुकीकडे लागले आहे. परंचु, मोदींचे राज्य हे लोकशाहीला हानीकारक आहे. मोदींचे राज्य पुन्हा येणार नाही. एवढी भारतातील जनता सज्ञान आहे असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठला समोर खोट बोलणारी शिवसेना अफजल खानाच्या मिठ्ठीत आहे. मोदी प्रत्येक भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वर टिका करतात. मात्र पाच वर्षात भाजप आणि शिवसेना यांनी काय केले ते मोदी सांगत नाही असेही पवार म्हणाले. राफेलवरून शरद पवारांनी मोदी आणि अंबानी संबंधांवर टिका केली. ना खाऊगा ना खाने दुगा, असे छप्पन इंचाची छाती असल्याचे सांगणारे मोदी राफेल प्रकरणात कोणी किती खाल्ले याचा शोध घेण्याची तयारी शासन दाखवत नाही. त्याचा शोध आमचे सरकार आल्यावर घेणार असे संकेत शरद पवार यांनी दिले.
             
यावेळी उमेदवार बाबाजी पाटील यांनी केलेल्या भाषणात माझ्या पाठीशी ग्रामीण भागातील 140 गावांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. उल्हासनगर शहर हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहे. यामुळे लोकसभेत आमचा उमेदवार निवडून येणार असे ज्योती कलानी म्हणाल्या. आमची सत्ता आल्यावर बंद पडलेला जिन्स उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ही लढाई मोदी विरुद्ध क्रोधीत जनतेची आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच बाजी मारणार, असे ही नाईक म्हणाले.

यावेळी ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार ज्योती कलानी, माजी खासदार संजीव नाईक, 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, प्रमोद हिंदुराव, भरत गंगोत्री, प्रमोद टाले, अंजली साळवे, गुलाबराब करनजुले, सदा पतीलझ प्रशांत धांडे, राधाचरण करोतीया, कुलदीप सिंग माथारु आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com