प्रकाश आंबेडकरांच्या लोकसभा उमेदवारीची होणार घोषणा!

Prakash Ambedkar will be the Lok Sabha candidate for the announcement!
Prakash Ambedkar will be the Lok Sabha candidate for the announcement!

सोलापूर : भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन समाजाला एकत्रित करण्याच्या निमित्ताने राज्यभर दौरा केला. आता ते 28 सप्टेंबर रोजी सोलापूरातील 28 सप्टेंबर रोजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. त्यामध्ये त्यांच्या सोलापूर लोकसभा उमेदवारीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 
एमआयएम बरोबर हात मिळविणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला पाठबळ मिळाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सोलापूरात धनगर, माळी महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. 

त्यामध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये अधिकाधिक लोकप्रतिनिधी विजयी करण्याचा निर्धारही करण्यात आला. यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख, माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, धनगर समाजाचे अर्जुन सलगर, आंबेडकरी चळवळीतील नेते प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते. सोलापूर शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून अॅड. आंबेडकर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभा राहण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्‍यता आहे. 

तिरंगी लढत होण्याची शक्‍यता

भाजपचे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी मागील लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव केला. परंतु, मोदी लाटेत निवडून आलेल्या ऍड. बनसोडे यांच्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या नाराजी दिसून येते. तरीही ते पुन्हा लोकसभेसाठी पुन्हा इच्छूक असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे कॉंग्रेसतर्फे श्री. शिंदे पुन्हा उभारण्याची शक्‍यता आहे. आता भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com